~~ रौप्यहोत्सवी वर्षानिमित्त वधु-वर परिचय मेळाव्यात सहर्ष स्वागत! ~~

Thursday 4 February 2016

नमस्कार,
               श्री.वीरशैव पट्टशाली लिंगायत कोष्टी समाज पिंपरी-चिंचवड संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वधु-वर परिचय मेळाव्यात उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत! 
               आज आपल्या संस्थेची वेबसाईट (ब्लॉग)  सादर करतांना विशेष आनंद होत आहे. २५ वर्षे समाजाची सेवा करतांना अनेक उपक्रम राबविले, त्यातलाच हा एक नवीन उपक्रम. समाजात तंत्रज्ञानाचा वापर होत असतांना आपला समाजही त्या प्रवाहात राहावा, संस्थेची उद्दिष्ट्ये, कार्ये,विविध उपक्रम,समाजातील विविध घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील या उद्देशाने सुरु केलेल्या या साईट द्वारे अधिक समाजसेवा घडावी, यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. धन्यवाद !

                                                              
***************************** ***************************************************                *********************************************************************************